सीमादर्शन
प्रत्यक्ष सीमेवर राहून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या आमच्या जवानांच्या जीवनाबद्दल काय सांगावे ?
अगदी वेगळे ! कल्पेनेच्याही पलीकडचं !
आपले जवान तिथे किती आनंदात राहतात ,
हे पाहून ऊर अभिमानाने भरून येतो.
जवानांच्या सेवेची, त्यांच्या त्यागाची, त्यांच्या देशभक्तीची तुलना कशाशी करायची?
आपला काम करताना, ते आपल्या जिवाचीही पर्वा करत नाहीत...
पण आपण त्यांच्यासाठी काय करतो?
प्रत्येक भारतीयाने पाहिलीच पाहिजेत अशी हि आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत, ती पाहायलाच पाहिजेत !
आपण कुठे नि कसे चुकलो, हे समजून घेतले पाहिजे आणि अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आपल्या परीने काळजी घेतली पाहिजे !
आपण एवढे तरी निश्चितच करू शकतो !
आपल्या जवानांबद्दल आत्मीयता असली कि बाकी सारे आपोआप होईल !
त्यासाठी चला जाऊया ' विविसु डेहरा ' बरोबर खालील पैकी एका तरी देशाच्या सीमारेषेला भेट द्यायला ..
Bangladesh | Pakistan | China | Myanmaar |
---|---|---|---|
Shilong - Meghalaya Agartala - Tripura |
Attari(Wagha)- Amrutsar, Panjab Husainiwala - Firozpur, Punjab Dras - Kargil |
Bumla - Tawang, Arunachal pradesh | Moreh - Imphal, Manipur |
एवढंच नाही, तर सीमारेषांवरच्या योद्ध्यांना सलाम करायला आणि त्यांच्याशी संवाद साधायला -
कारण देशाचा सीमारेषांचे रक्षण करताना शत्रूचा पहिला वार सर्वात आधी अंगावर घेतात ते भारताचे सीमा सुरक्षा दलाचे जवान. वाळवंट, डोंगर, नदी, नाले आणि समुद्रातून जाणाऱ्या भारताच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी लाखो जवान ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता घट्ट पाय रोवून रात्रंदिवस सीमारेषांवर उभे असतात .
देशाच्या सीमारेषांवर जागता पहारा ठेवणाऱ्या या योद्ध्यांजवळ, आपल्या भावना व्यक्त करूया आणि त्यांना सलाम करूया कारण -
"आज ते आहेत म्हणून आपण उद्याचा दिवस बघू शकतो.."
Booking Form