आजच्या "ऑडिओ - व्हिडीओ " च्या जमान्यात,
मुंबईच्या फास्ट लाईफ मध्ये,
आपले WHATS’APP, FACE-BOOK, SMS
या व्यतिरिक्त अवांतर वाचन कमी झालेले आहे,
हे जरी खरे असले,
तरी प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतील -
उत्कृष्ट साहित्य, कथा, कादंबऱ्या, नाटकं वाचायची इच्छा असते,
पण वेळेअभावी ते शक्य होत नाही.
वपु (काळे) म्हणतात, त्याप्रमाणे -
स्वतःच्या लेखनाचा पहिला वाचक, स्वतः लेखकच असतो.
तो स्वतःला न्याय देण्याच्या प्रयत्नात असतो.
तो तानपुऱ्याचा एक षड्ज छेडतो.
वाचकांच्या भावविश्वाची किंवा अनुभवांशी, ती कंपने पोहोचली,
तर दुसरा षड्ज लागतो.
लिहिलेली कथा - सांगितली जाते,
म्हणूनच जुळलेल्या स्वरांचं एकत्र संमेलन म्हणजेच -
कथाकथन !
मात्र एकदा हे सूर जुळले म्हणजे,
जी मैफल जमवायची असते,
ती शब्दांचीच, कारण -
कथाकथन !!
हि निव्वळ शब्दसृष्टी आहे.
मराठी साहित्यातील, लिखित वाङ्मयाला , कथित साहित्याचे सुद्धा सामर्थ्य आहे,
आणि ती एक PERFORMING ART आहे
हे अनुभवण्यासाठी आणि
निव्वळ शब्दसृष्टीत, बारमास वसंत ऋतू दरवळावा , यासाठी -
प्रथितयश लेखकांच्या कथांचे,
कथाकथन !!!
एक होता कार्व्हर
गोष्ट म्हणजे निसर्ग, सृष्टी, प्राणिमात्र आदींच्या
अनुभूतीतूनच
कळत नकळत घडलेल्या घटनांचा क्रम ...
मानव हा जीवनात अनेक टप्प्यावर, वळणावर घडत
असतो ...
त्याची घडण घडविणारी घटना ही एक गोष्टच असते.
गोष्ट - ऎकणे, ऎकवणे यापेक्षा गोष्ट भावणे महत्वाचे असते
त्यातून मिळतो निरागस आनंद, स्फूर्ती व संजीवन,
त्यातूनच निर्माण होतात असामान्य कर्तुत्वाच्या व्यक्ती.
त्यांच्यामुळेच होतो, समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा उध्दार
मग घडतो इतिहास व त्या इतिहासाचीच बनते गोष्ट.
गोष्ट - अशी युगानुयुगे घडतच असते
युगानुयुगे ऐकवली जाते
त्यातून वेचायची असतात जीवनमुल्ये,
घ्यायचा असतो बोध
आणि
आत्मशोध - नवनिर्मितीसाठी.
गोष्ट - अशाच एका कर्तुत्ववान असामान्य
स्वयंप्रकाशी व्यक्तीची ...
त्याग, कर्तव्य, सामाजिक जाणिव
आदी विविध पैलूंचे दर्शन घडविणारी ...
वीणा गवाणकर लिखीत
या पुस्तकावर
आधारित.